विराट कोहली सध्या अधिक चर्चेत आहेत. पण यावेळेस त्यांच्या खेळासाठी नव्हे तर अभिनयासाठी. नुकतीच प्रदर्शित झालेली त्यांची जाहिरात साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात करणने पाहिली आणि त्याला ही जाहिरात फारच आवडली. जाहिरात पाहून त्याने दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि विराटचे भरभरून कौतुक केले. करण त्याच्या आगामी सिनेमामध्ये विराट कोहलीला घेण्यास उत्सुक आहे. आता विराट हिरो झाला तर त्याची हिरोईन अर्थातच अनुष्का असेल यात काही शंका नाही.
जर खरेच असे झाले तर विराटच्या चाहत्यांना हे कितपत आवडेल याबाबत शंकाच आहे. तसेच यावर्षी डिसेंबरमध्ये विराट अनुष्कासोबत साखरपुडा करणार असल्याच्याही बातम्या येऊ लागल्या होत्या. विराटने वैयक्तिक कारणांमुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंका कसोटी मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला होता. विश्रांतीसाठी त्याने बीसीसीआयकडे सुट्टीचा अर्ज टाकला होता पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली असून श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. सुट्टीचा अर्ज फेटाळल्यामुळे विराट- अनुष्काच्या साखरपुड्याच्या बातमीवर काही अंशी पाणी फिरल्याचे दिसते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews